राफेल करारामुळेच मनोहर पर्रीकर आजारी, मानवेंद्रसिंगांची खळबळ

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतिअस्वास्थ्याचे कारण राफेल करार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपला सोडचिठ्ठी देत आजच काँग्रेसवासी झालेल्या मानवेंद्रसिंग यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजप नेते जसवंत सिंग यांचे चिरंजीव व राजस्थानमधील विद्यमान आमदार मानवेंद्र सिंग आणि भाजपचे महाराष्ट्रातील काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या 24 अकबर रोड या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मानवेंद्रसिंगांनी सनसनाटी विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या