
नवी मुंबईत मिंध्यांना धक्का बसला आहे. सहसंपर्कप्रमुख शिरीष काशिनाथ पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर आणि संदिप साळवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते राजन विचारे, विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




































































