भीमा-कोरेगाव दंगल भडकवण्यासाठी 5 लाख रुपये दिले, पोलिसांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा-कोरेगाव दंगल आणि एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या शहरी नक्षलवाद्यांचा सरकार उलथवण्याचा मोठा डाव होता असा गोप्यस्फोट पोलिसांनी केला आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये हजारो संशयास्पद कागदपत्रे सापडली असून त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचे पोलीस महासंचाकांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वा, गौतम नवलखा आणि वर्नण गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली. ही अटक अत्यंत योग्य होती परंतुतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला, असेही पोलीस महासंचालक परमवीर सिंग म्हणाले. तसेच भीमा-कोरेगाव दंगल आणि बंदी असलेल्या नक्षली संस्थांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये हजारो संशयित कागदपत्रे, कम्प्यूटर्स आणि लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. दरम्यान, या सगळ्या कागदपत्रांवरून माओवाद्यांचा शस्त्रसाठा विकत घेण्याचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा तसेच केंद्र सरकार उलथवून टाकण्याचा मोठा कट होता असे परमवीर सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

  • भीमा- कोरेगाव हिंसाचार भडकवण्यासाठी  5 लाख रुपये दिले
  • कटाचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती
  • 5 ते 10 लाखांच्या व्यवहाराचा पत्रात उल्लेख
  • देशात अराजक माजवण्याचा माओवाद्यांचा होता कट
  • मिलींद तेलतुंबडेच्या पत्रामध्ये आक्षेपार्ह उल्लेख
  • तेलतुंबडेने भीमा-कोरेगाव दंगलीनंतर लिहिले पत्र
  • पुढील तपास सुरु क्लोन कॉपिजच्या आधारे सुरु आहे
  • छाप्यादरम्यान जप्त केलेला मुद्देमाल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे
  • 6 जणांविरोधात FIR दाखल केला आहे.
  • ग्रेनेड लॉंचर खरेदी बाबत कागदपत्रात माहिती
  • शस्त्र खरेदीसंदर्भातील महत्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती
  • आर्थिक मदतीची मागणी करणारी पत्र पोलिसांच्या हाती
  • माओवादी मोठ्या कटात सहभागी
  • छापेमारीचे संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्डींग
  • 17 एप्रिल रोजी छापे टाकले होते.
  • कारवाई दरम्यान तपासात महत्वाची कागदपत्रे सापडली.
  • अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांची पत्रकार परिषद.