
मुंबईत राहणाऱ्या अखिल 96 कुळी मराठा समाजाचे स्नेहसंमेलन उद्या, गुरुवारी दुपारी 4 वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृहात पार पडणार आहे. प्रमोद साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. यावेळी चेतन सावंत यांचा संगीत सदाबहार स्वरांजली व शंकर मेस्त्री यांचे ‘दहिकालो’ हे दशावतारी नाटक सादर होईल. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गातील मुंबईत राहणाऱ्या सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप चव्हाण यांनी केले.