
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठा समाजास आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीकरिता राज्यभरात आधी मुक मोर्चे आणि नंतर ठोक मोर्चे काढण्यात आले, आंदोलने करण्यात आली. मात्र, सरकारकडून फक्त आश्वासनं दिली गेली. जर ही आश्वसनं पूर्ण करण्यात आली नाही तर डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मराठा आंदोलकांनी ९ ऑगस्ट रोजी केलेल्या महाराष्ट्र बंद नंतर आज मराठा मोर्चाकडून आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये सरकारने येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करावे, अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मोर्चे, आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच मराठा आंदोलनासंदर्भातही त्यांनी काही महत्वाचे ठराव केले, जसे सोशल मीडियावरून थेट आंदोलन जाहीर करू नये. त्यासाठी आधी पोलिसांची परवानगी घेऊन मगच आंदोलन करावे. अन्यथा त्या आंदोलनाचा फटका मराठा तरुणांना बसतो, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी बैठकीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे-पाटील, महेश राणे उपस्थित होते.
summary: maratha morcha protest warns government if demands not fullfilled by November protest will continue from December.























































