मराठा आरक्षणाबाबत भक्कमपणे बाजू मांडणार, न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा

289

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज वरिष्ठ वकिलांसोबत बैठक झाली. मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकार 7 जुलै रोजी होणाऱया सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल, असे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत सर्वेच्च न्यायालयातील नियोजित असलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शनिवारी सकाळी 11.30 वाजता झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी, परमजितसिंग पटवालिया, विजयसिंह थोरात, अनिल साखरे सहभागी झाले होते.

– येत्या मंगळवारी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. या दोन्ही सुनावणीच्या अनुषंगाने यावेळी विस्तृत चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या