
सामना ऑनलाईन । मुंबई
मराठा आरक्षणाबाबत राज्यभर सुरू असलेल्या आंदोलानानंतर आज उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी वेळी आयोगाचा अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तर पुढील सुनावणी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलना दरम्यान राज्यात झालेल्या हिंसक घटनांची दखल न्यायालयाने घेतली. तसेच या आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आत्महत्यांची आम्हाला चिंता वाटते असेही उच्च न्यायालय म्हणाले. यावर आपली बाजू मांडतांना ५ सप्टेंबरपर्यंत या संदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती मागासप्रवर्ग आयोगाकडून देण्यात आली. तसेच मागासप्रवर्ग आयोगाची माहिती अंतिम अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




























































