मराठी अभिनेत्री पुन्हा साकारणार लेस्बियन भुमिका

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सिरीजमध्ये लेस्बियन महिलेची भुमिका साकारली होती. त्या वेबसिरीजमध्ये तिने किसिंग सिन देखील दिला होता. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती. आता पुन्हा एकदा प्रिया बापट अशाच प्रकारची एक भुमिका साकारणार आहे. फादर लाईक या चित्रपटात ती ही भूमिका साकारणार असून हा चित्रपट तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा असणार आहे.


View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

फादर लाईक या चित्रपटात प्रिया ही साराहची भूमिका साकारणार असून तिच्या लेस्बियन गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री गितीका विद्या ओहलान साकारणार आहे. गितीकाच्या भूमिकेचे नाव सेरेना असून ती लॉकडाऊनमध्ये सिंगापूरला अडकते. लॉकडाऊनमधील त्यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिप बाबत या चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य क्रिपलानी यांनी केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या