PHOTO मराठी कलाकारांमध्ये 80 च्या रेट्रो लूकची क्रेझ…

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एक अनोखा ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला ‘#असंभव80s’ हा ट्रेंड मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या कलाकारांना भुरळ घालत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुमित राघवन, अंकुश चौधरी, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, अभिजीत पानसे, आनंद इंगळे, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, सुयश टिळक, प्रिया बेर्डे, रेशम टिपणीस, कविता लाड, गौरी कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांनी या ट्रेंडचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.