
निवडणूक प्रचारासाठी घरात कसे घुसलात, अशी विचारणा केल्याने राग आलेल्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी मराठी पुटुंबाला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार दहिसरमध्ये घडला आहे. यासंदर्भात विजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुरक्षा रक्षकाचे काम करणारे विजय पाटील दहिसर पश्चिमेला कांदरपाडा येथे राहतात. त्यांची पत्नी प्रमिला पाटील म्हणाल्या, आम्ही आदिवासी आहोत. मी माझ्या नऊ महिन्यांच्या बाळासह घरात होते. अचानक एक जण प्रचार इधर करना है, क्या? असे म्हणत आमच्या घरात घुसला. तो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे माझ्या पतीच्या लक्षात आले. त्यांनी त्याला घराबाहेर जायला सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्याने फोन करून प्रचारासाठी आलेल्या 50 जणांना बोलावले आणि माझे पती आणि दिराला दगड, झेंडय़ाच्या दांडय़ांनी मारहाण केल्याचे सांगितले.































































