मास्कचा वापर करून कैद्याने केली आत्महत्या

807

अमेरिकेतील कनेक्टीकट भागातील तुरुंगामध्ये एका कैद्याने मास्कचा वापर करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा मास्क या कैद्याला कोरोनापासून बचावासाठी देण्यात आला होता. डॅनिअल ओकॅसिओ असं या कैद्याचं नाव आहे. बुधवारी त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बुधवारी सकाळी 5 वाजून 7 मिनिटांच्या सुमारास डॅनिअल हा कोरिगन रागोवस्की सुधारगृहामधील बंकवर बसलेला होता. अधिकाऱ्यांनी त्याला हलविले तेव्हा तो मृत झाला असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी त्याला नीट तपासले असता त्याच्या गळ्याभोवती व्रण दिसून आले होते. मुख्य वैद्यकीय अधिकारी जेम्स गिल यांनी गुरुवारी डॅनिअलने आत्महत्या केली होती असा निष्कर्ष जाहीर केला.

डॅनिअलला ३२ वर्षांचा होता आणि तो विंडसर भागात राहायला होता. 5 ऑगस्टला त्याला अटक करण्यात आली होती. चोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॅनिअलला 10 हजार डॉलर्सची हमी रक्कम न्यायालयात भरता न आल्याने त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. डॅनिअलने मास्कची दोरी आणि कापडाचा वापर करून गळफास बनवला होता आणि त्याच्याच मदतीने आत्महत्या केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या