अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नगरला मातंग परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. नवीन टिळक रोड वरील माऊली सांस्कृतिक भवनात मातंग राज्यव्यापी परिषद होणार आहे.

मातंग समाजास ‘अ, ब, क, ड’ असे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण दिले जावे, मातंग समाजावरील वाढत्या जातीय अत्याचारांना प्रतिबंध करावा, आद्यक्रांती वीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज संशोधन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ मातंग समाजाला मिळावा. इत्यादी मागण्यांसाठी नगर येथे मुक्ता साळवे मातंग समाज सत्ता संपादन राज्य व्यापी परिषद होणार आहे.

मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे, नामदेवराव चांदणे, सुधीर वैरागार, मंजाबापू साळवे,  अ‍ॅड. लक्ष्मण बोरुडे, अनिल भोसले, निवृत्ती घोडके, विनायक गोरखे, भगवान मिसाळ, उमेश साठे, पोपट जाधव, सुनिल शिंदे, कडुबाळ ससाणे, संजय गाडे आदींनी या परिषदेचे आयोजन केले आहे.

जनहित लोकशाही पक्ष लिबरेशन टायगर फोर्स ऑफ दलित इलम, दलित महासंघ, लहुजी शक्ती सेना, दलित युवक आंदोलन, भारतीय टायगर फोर्स, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे उत्कर्ष मंडळ, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समिती प्रतिष्ठान, बहुजन रयत परिषद या संस्थांनी या परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे.

जेष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे परभणी, बीड, नगरचे निरीक्षक प्रा. किसन चव्हाण, अ‍ॅड.  अरुण जाधव, अशोक आल्हाट, गणपत भिसे, शाहीर शीतल साठे, सचिन बगाडे, जोशीला लोमटे, भारिप बहुजन महासंघाचे नगर दक्षिणचे अध्यक्ष अशोक सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नगर जिल्ह्याचे निमंत्रक डॉ. जालिंदर घिगे, द्वारका सरोदे, काशिनाथ सुलाखे, साहेबराव पाचारणे, ना. म. साठे, सोमनाथ शिंदे, जयंत लोखंडे, दामोदर अण्णा गायकवाड, कडुदास कांबळे इत्यादी राज्यभरातील पदाधिकारी व विविध संघटनांचे प्रमुख या परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.