माथेरानची राणी पुन्हा धावणार; 6 नोव्हेंबरपासून प्रवासी सेवेत

माथेरानला जाताना पर्यटकांना सर्वाधिक भुरळ घालणारी माथेरानची राणी पुन्हा प्रवासी सेवेत रुजू होत आहे. मध्य रेल्वेवरील नेरळ-माथेरान दरम्यानची ट्रेन सेवा 6 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने जून ते ऑक्टोबर या काळात नेरळ-माथेरान मार्गावरील सेवा बंद ठेवण्यात येते. मात्र अमन लॉज आणि माथेरान दरम्यान शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू असतात.

गाडी क्रमांक 52103/52104 या गाड्या एकूण सहा कोचेससह चालतील. यात तीन द्वितीय, ओक व्हिस्टाडोम कोच आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान वाहक व्हॅन असेल. तर गाडी क्रमांक 52105/52106 या गाड्या एकूण सहा कोचेससह चालतील. यात तीन द्वितीय, एक प्रथम कोच आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान वाहक व्हॅन असेल.

नेरळ-माथेरान ते अमन लॉज-माथेरान दरम्यानच्या रेल्वे सेवांच्या वेळा

(अ) नेरळ – माथेरान – नेरळ ट्रेन सेवा:–

नेरळ–माथेरान डाउन गाड्या

  • ट्रेन क्रमांक 52103 नेरळ येथून 8.50 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 11.30 वाजता पोहोचेल
  • ट्रेन क्रमांक 52105 नेरळ येथून 10.25 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 13.05 वाजता पोहोचेल

माथेरान – नेरळ अप गाड्या

  • गाडी क्रमांक 52104 माथेरान येथून 14.45 वाजता सुटेल आणि नेरळ येथे 17.30 वाजता पोहोचेल
  • गाडी क्रमांक 52106 माथेरान येथून 16.00 वाजता सुटेल आणि नेरळ येथे 18.40 वाजता पोहोचेल

(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा

  • गाडी क्रमांक 52153 अमन लॉज येथून 8.45 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 9.03 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52155 अमन लॉज येथून 9.35 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 9.53 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52157 अमन लॉज येथून 12.00 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 12.18 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52159 अमन लॉज येथून 14.25 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 14.43 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52161 अमन लॉज येथून 15.40 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 15.58 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52163 अमन लॉज येथून 17.45 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 18.03 वाजता पोहोचेल.

शनिवार / रविवार विशेष सेवा खालीलप्रमाणे:

  • विशेष-1 अमन लॉज येथून 10.30 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 10.48 वाजता पोहोचेल.
  • विशेष-3 अमन लॉज येथून 13.35 वाजता सुटेल आणि माथेरान येथे 13.53 वाजता पोहोचेल.

माथेरान – अमन लॉज शटल सेवा

  • गाडी क्रमांक 52154 माथेरान येथून 8.20 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 8.38 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52156 माथेरान येथून 9.10 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 9.28 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52158 माथेरान येथून 11.35 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 11.53 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52160 माथेरान येथून 14.00 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 14.18 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52162 माथेरान येथून 15.15 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 15.33 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 52164 माथेरान येथून 17.20 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 17.38 वाजता पोहोचेल.

शनिवार / रविवार विशेष सेवा खालीलप्रमाणे:

  • विशेष-2 माथेरान येथून 10.05 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 10.23 वाजता पोहोचेल.
  • विशेष-4 माथेरान येथून 13.10 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 13.28 वाजता पोहोचेल.