आधी जाऊन विकास बघा, मगच बोला! मावळच्या बारणे यांचे पार्थ पवारांना आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उरण

शिवसेनेने उरण तालुक्यातील खोपटे गावाचा कायापालट केला. या गावात रस्ते, लाइट, ड्रेनेजची व्यवस्था केली. असे असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे ज्यांना दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही ते मावळचा विकास काय करणार असे म्हणत आहेत. पवार, आधी गावात जाऊन तेथील विकास बघा मगच बोला, असे आवाहन बारणे यांनी पार्थ पवार यांना केले आहे.

शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना स्वतः दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही. ते मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास काय करणार, अशी टीका पार्थ पवार यांनी एका प्रचारसभेत केली होती. त्याला श्रीरंग बारणे यांनी आज उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आपण खोपटे गाव दत्तक घेतले. त्यानंतर या गावात रस्ते, लाइट तसेच ड्रेनेजची सुविधा उपलब्ध करून दिली. मुख्य रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवले. हे गाव 100 टक्के हागणदारीमुक्त झाले आहे. प्राथमिक शाळेत सर्व प्रकारचे शासकीय दाखले ऑनलाइन मिळत आहेत. बस स्टॉपच्या कामालाही मंजुरी मिळाली. याला विकास नाहीतर काय म्हणायचे. तेव्हा विरोधकांनी आधी गावात जाऊन विकास बघा, मगच बोला असे आव्हान बारणे यांनी दिले.

नेव्हल डॉकयार्ड चित्रकला विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने फोर्ट येथील बॅलार्ड बंदर, टायगर प्रवेशद्वाराजवळ कला रसिकांसाठी चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या चित्रकला प्रदर्शनाला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली. 16 कलाकारांची तब्बल 90 चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. 500 रुपयांपासून ते 8 हजार 500 रुपयांपर्यंत किंमत असलेली ही चित्रे आहेत. या चित्रांच्या विक्रीतून दरवर्षी जमणारा दीड लाख रुपयांचा निधी डॉकयार्ड कर्मचारी कल्याण निधीत जमा करण्यात येतो. या प्रदर्शनाचे पश्चिम विभागाचे उद्घाटन व्हाईस ऍडमिरल अजित कुमार यांच्या हस्ते झाले. ही चित्रे पाहून त्यातील कल्पनाविष्कार तसेच रंगसंगती पाहून रसिक प्रेक्षकांनी चित्रांचे प्रचंड कौतुक केले. या चित्रप्रदर्शनाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.