मयांक अग्रवालची तुफानी खेळी, सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकलं

1014
mayank-agarwal-indoor

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघातील इंदूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत फलंदाज मयांक अग्रवालने कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावले आहे. त्याच्या दुसऱ्या द्विशतकासह त्याने कसोटी क्रिकेटच्या दुनियेतील बादशाह सर डॉन ब्रॅडमन यांना देखील मागे टाकलं आहे. त्यामुळे मयांकवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

मयांक अग्रवाल याने तडाखेबंद खेळ करत द्विशतक साजरे केले. त्याने 300 चेंडूत 200 धावा केल्या. त्यानंतर वैयक्तिक 243 धावांवर तो बाद झाला. यावेळी त्याने सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकलं. ब्रॅडमन यांनी 13 डावांमध्ये कसोटी कारर्दितील दुसरं द्विशतक झळकावलं होतं. मात्र मयांकने 12 डावांमध्ये हा पराक्रम करून दाखवला आहे. मयांक यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे हिंदुस्थानचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

#INDvBAN – टीम इंडियाला सहावा धक्का, वृद्धीमान साहा बाद

 

आपली प्रतिक्रिया द्या