#INDvBAN – दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाकडे 343 धावांची आघाडी

20925

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघातील पहिला कसोटी सामना इंदूरमध्ये सुरू आहे. बांगलादेशचा कर्णधार मोनिमूल हक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानच्या धारधार गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांमध्ये कोसळला. शमीने सर्वाधिक तीन, तर उमेश यादव, अश्विन आणि इशांत शर्माने प्रत्येकी दोन बळी घेतले.

बांगलादेशला झटपट गुंडाळल्यानंतर फलंदाजीला आलेल्या हिंदुस्थानला पहिल्या डावात सुरुवातीलाच धक्का बसला. फॉर्मात असणारा रोहित शर्मा अवघ्या 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा आणि अग्रवालने किल्ला लढवत आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पुजारा 43 आणि अग्रवाल 37 धावांवर खेळत होता.

लाईव्ह अपडेट –

 • रविंद्र जाडेजा (60) व उमेश यादव (25) हे दोन फलंदाज मैदानावर
 • दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाकडे 343 धावांची आघाडी

 • रविंद्र जाडेचाचे अर्धशतक

 • टीम इंडियाला सहावा धक्का, वृद्धीमान साहा बाद
 • रविंद्र जाडेजा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
 • वृद्धीमान साहा मैदानावर
 • टीम इंडियाला पाचवा धक्का, 243 धावा करून मयांक बाद
 • मयांक अग्रवालचे द्विशतक, कारकिर्दीतले दुसरे द्विशतक

 • टीम इंडियाची 209 धावांची आघाडी
 • मयांक अग्रवाल दुहेरी शतकाच्या उंबरठ्यावर
 • टीम इंडियाच्या 4 बाद 336 धावा
 • अजिंक्य रहाणे 86 धावांवर बाद
 • पुजारा 43 आणि अग्रवाल 37 धावांवर नाबाद
 • हिंदुस्थानचा संघ अद्याप 64 धावांनी पिछाडीवर
 • दिवसअखेर हिंदुस्थानच्या 1 बाद 86 धावा

 • टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण
 • 10 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 22 धावा

अश्विनची हरभजन व कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी

 • अबू झायेदने 6 धावांवर केले बाद
 • हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

 • सात षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 14 धावा
 • मयांक अग्रवाल-रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात
 • हिंदुस्थानचा पहिला डाव सुरू
 • बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांत गारद
 • बांगलादेशला एकामागोमाक एक तीन धक्के
 • चहापानंतर बांगलादेशचा डाव सुरू

 • चहापानापर्यंत बांगलादेशच्या 7 बाद 140 धावा
 • मेहंदी हसन शून्यावर बाद
 • बांगलादेशला सातवा धक्का, शमीचा तिसरा बळी
 • मोहम्मद शमीने घेतला दुसरा बळी
 • बांगलादेशला सहावा धक्का, रहिम 43 धावांवर बाद

 • 52 षटकानंतर बांगलादेशच्या 5 बाद 139 धावा
 • मोहम्मदुल्लाह 10 धावांवर बाद
 • बांगलादेशला पाचवा धक्का
 • बांगलादेशच्या 100 धावा पूर्ण
 • मोनिमल हक 37 धावांवर बाद
 • बांगलादेशला चौथा धक्का

 • लंचपर्यंत 3 बाद 63 धावा

 • बांगलादेशच्या 50 धावा पूर्ण
 • मोहम्मद मिथून 13 धावांवर बाद
 • बांगलादेशला तिसरा धक्का
 • शदमान इस्लाम 6 धावांवर बाद
 • एकाच धावसंख्येवर बांगलादेशला दुसरा धक्का, दोन्ही सलामीवीर माघारी
 • बांगलादेशचा सलामीवीर इमरूल कायस 6 धावांवर बाद
 • टीम इंडियाला पहिले यश
 • बांगलादेशचा डाव सुरू
आपली प्रतिक्रिया द्या