नागरिकत्व कायद्याला पाठिंबा; बसपाच्या महिला आमदार निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना बसपाच्या महिला आमदाराला जाहीर सभेत कायद्याला पाठिंबा देणे महागात पडले. कायद्याला पाठिंबा दिला म्हणून बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आमदार रमाबाई यांना पक्षातून निलंबित केले. नागरिकत्व  सुधारणा कायद्यात मुस्लिम निर्वासितांचा समावेश नसल्यामुळे ही सुधारणा धर्मावर आधारित असल्याचा आरोप करत देशभरात याचा विरोध केला जात आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीनेही या सुधारणेचा विरोध  केला आहे, मात्र मध्य प्रदेशच्या दामोह जिल्हय़ाच्या बसपाच्या आमदार रमाबाई यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या सार्वजनिक सभेत नागरिकता कायद्याला जाहीर पाठिंबा दिला. याची गंभीर दखल घेऊन रमाबाई यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.