कोस्टल रोडमुळे कोळी बांधवांच्या उपजीविकेमध्ये बाधा नको! महापौरांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोळी बांधव हे भूमिपुत्र आहेत. कोस्टल रोडच्या कामांमुळे कोळी बांधवांच्या उपजीविकेमध्ये कोणतीही बाधा येता कामा नये, असे निर्देश महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले. पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा सागरी मार्ग आहे. या प्रकल्पाबाबत शुक्रवारी वरळी भागातील कोळी संघटनांनी पालिका मुख्यालयात महापौरांची भेट घेतली व आपल्या सूचना केल्या.

शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, खासदार अनिल देसाई, उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे, पालिका आयुक्त अजोय मेहता, कोस्टल रोडचे मुख्य अभियंता मोहन माचीवाल यावेळी उपस्थित होते.