रौप्यमहोत्सवी वर्षात चाखायला मिळणार नव्या बर्गर्सची चव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mcdonalds-new-burger

मॅकडोनाल्ड्स यावर्षी आपला रौप्यमहोत्सव साजरा करत आहे आणि या निमित्ताने हा ब्रँड आपल्या ग्राहकांना हा टप्पा साजरा करण्याचे आणखी एक संधी देत आहे.

मॅक आलू टिक्की, महाराजा मॅक, मॅकस्पायसी, मॅकव्हेजी आणि मॅकचिकन यांच्यासारखे लोकप्रिय पदार्थ विकण्याच्या 25 वर्षांनंतर वेस्टसाइड डेव्हलपमेंट लिमिटेडच्या नेतृत्वाखालील मॅकडोनाल्ड्सने (पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थान) अत्यंत चविष्ट गॉरमेट बर्गर्सची एक नवीन श्रेणी आणली आहे. या शेफ्स स्पेशल रेंजमध्ये खास आणि मोठ्या आकाराचे अत्यंत स्वादिष्ट बर्गर्स आहेत. त्याला खास मॅकडोनाल्डचा टच देण्यात आला असून तुमच्या यादीत काही नवीन फेवरेट्स समाविष्ट होऊ शकतील.

हिंदुस्थानात मॅकडोनाल्डच्या ब्रँडसाठी मेन्यूमधील नावीन्यपूर्णता हा एक महत्त्वाचा घटक होता. या ब्रँडने आपल्या उत्पादनांमध्ये यशस्वीरित्या स्थानिक चवी आणल्या आहेत. आपल्या गॉरमेट रेंजच्या अनावरणासोबत मॅकडोनाल्डचे उद्दिष्ट बर्गरच्या वर्गवारीत आपले नेतृत्व मजबूत करण्याची आहे. या नवीन बर्गर्सना गॉरमेंट बनवणारी गोष्ट म्हणजे त्याच्या चविष्ट पॅटीस, त्यातील घटक आणि त्यात असलेले सॉसेस आहेत. ही श्रेणी अत्यंत मजेदार चिझी स्वाद आणि मसाल्यांसह आहे. त्यामुळे ते प्रत्येक चवीला तोच न्याय देतात. हे बर्गर आकाराने मोठेही आहेत आणि ग्राहकांना मॅकडोनाल्डमध्ये अधिक पोटभर खाद्यपदार्थांचे पर्याय देण्यासाठी बनवलेले आहेत.

या नवीन गॉरमेट बर्गर कलेक्शनच्या अनावरणाबाबत बोलताना स्मिता जैन, संचालक, वेस्टलाइफ डेव्हलपमेंट लिमिटेड म्हणाल्या की, ”मेनूमधील नावीन्यपूर्णताहा आमचा डीएनए आहे. आम्ही कायमच आमच्या मेनूमध्ये स्थानिक चवी आणि प्राधान्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी आम्ही खऱ्या अर्थाने मॅकडोनाल्डच्या पद्धतीने जगभरातील चवी हिंदुस्थानात आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रीमियम बर्गर्सची ही नवीन श्रेणी उत्तम पदार्थांसह उत्तमरित्या तयार करण्यात आली आहे आणि तिचे उद्दिष्ट ग्राहकांना पोटभरीचे पर्याय देऊन आमच्या रेस्टॉरंट्समध्ये उत्तम खाद्यपदार्थांचे पर्याय देण्याचे आहे.”