मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या तस्कराला अटक, 3 लाखांचे एमडी जप्त

पुणे शहरातील वडगाव ब्रीज परिसरात मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 3 लाख 7 हजारांचे 21 ग्रॅम मेफ्रेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. शम्स महम्मद अली झवेरी (60 रा. काशीमिरा, मिरा रोड ईस्ट) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड स्टाफसह सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वडगावमधील नवले ब्रीजकडे जाणाऱ्या सर्विस रस्त्यावरील रस्त्यावर शम्स झवेरी हा आढळून आला.

अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 3 लाख 7 हजारांचा मेफ्रेड्रॉन मिळून आला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटक्के, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुके, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या