मेगा ब्लॉक: वर्धा-बल्लारपूरसह अनेक पॅसेंजर गाड्या बेमुदत रद्द

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

मध्य रेल्वेने विविध कामांच्या व्यत्ययामुळं आजपासून अनेक पॅसेंजर गाड्या बेमुदत रद्द केल्या. यात चंद्रपूरसाठी महत्त्वाची असलेली वर्धा-बल्लारपूर ही रेल्वेही रद्द करण्यात आली. यामुळं प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

सध्या मध्य रेल्वे विभागातर्फे विविध कामं सुरू आहेत. यामध्ये नॉन इंटरलोकींग, यार्ड नुतनीकरण, नवीन प्लॅटफॉर्म, तिसरी रेल्वे लाईन निर्माण अशी विविध कामे समाविष्ट आहेत. यामुळं पॅसेंजर गाड्या चालवणं कठीण होत आहे. मात्र त्याचवेळी जलद गाडया कायम ठेवण्यात आल्यात. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यानं, सोबतच रोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांची मोठी गैरसोय झाल्यानं त्यांच्यात असंतोष आहे. या गाड्या केव्हा सुरू होणार, हेही रेल्वेनं स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळं लोकांत रोष आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या
(कंसातील नंबर गाड्यांचे असून अप-डाउनचे आहेत)
1) भुसावळ-वर्धा (51197-98)
2) भुसावळ-नरखेड (51183-84)
3) नरखेड-न्यू अमरावती (51152-51)
4) वर्धा-बल्लारपूर (51195-96)