मध्य रेल्वे उद्या धिम्या ट्रॅकवर; माटुंगा ते मुलुंडदरम्यान साडेचार तासांचा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेमार्गावर येत्या रविवारी माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.45 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या अवधीत सर्व जलद गाडय़ा धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱया डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. त्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान नियोजित थांबे घेतील. त्या गाडय़ा गंतव्यस्थानी 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱया जलद गाडय़ा मुलुंड स्थानकावर पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्यावरून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 पर्यंत सुटणाऱया अप जलद मार्गावरील गाडय़ा मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.