आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, गाड्या 15 ते 20 मिनीटे उशीराने धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आज रविवारी फक्त मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला नसल्याने त्या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे डाऊन धिम्या मार्गावरील लोकल गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर धावतील. या काळात मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या आणि जाणा-या लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील. तसेच कल्याणच्या दिशेकडे जाणा-या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर धावतील. त्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबणार नाहीत. त्यानंतर, मुलुंड येथून धिम्या मार्गावर धावतील. धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार, कांजूर, नाहूर येथेही थांबणार नाहीत.