मेहकर उपविभागीय कार्यालयास आग, अनेक कागदपत्रे जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयास गुरुवारी पहाटे अचानक आग लागून बरेच रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. 31 मार्च रोजी अंदाजे दीड दोनच्या दरम्यान उपविभागीय कार्यालयातील निवडणूक विभागास आग लागली. ही आग नैसर्गिक आपत्ती विभाग व एस.डी.ओ ऑफीसमध्येही पसरली होती. या आगीमुळे निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती विभागाचे सर्व रेकॉर्ड जळाले आहेत तर एस.डी.ओ कार्यालयातील अर्धे रेकॉर्ड जळाले आहेत. रात्री उशिरा लागलेल्या आगीबाबत पहाटे साडेचारच्या सुमारास आसपासच्या नागरिकांनी अगिनशमन दलाला कळवले. आगीचे वृत्त कळताच लोणार, चिखली येथूनही अग्निशमन दलाच्या बोलावण्यात आल्या होत्या. सकाळी 11 वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.