मालवणीतील मेट्रो कारशेडचे काम 80 टक्के पूर्ण, महाधिवक्त्यांची हायकोर्टात माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो 2 (अ), मेट्रो 2 (ब) आणि मेट्रो 7 करिता मालवणी येथे एमएमआरडीए मार्फत कारशेड बांधण्यात येणार आहे. या कारशेड चे काम 80 टक्के पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात उर्वरित काम पूर्ण होईल अशी माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आज हायकोर्टात दिली.

मालवणी येथे 74 हजार 990 स्क्वे मीटर जागेवर कारशेड बांधण्यात येणार आहे. कारशेडचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून कारशेडमध्ये मोठय़ा मशीन नेण्यासाठी एका भूखंडाची 3 हजार स्क्वेअरमीटर जागा एमएमआरडीएला हवी आहे. सदर भूखंड सरकारने भाडेपट्टय़ावर दिला होता मात्र या जागेवर आता तेथील काही सोसायटय़ांनी दावा केला आहे हा वाद 2002 साला पासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असून हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. मात्र मोठय़ा मशिनरी कारशेड मध्ये आणण्यासाठी व त्याठिकाणी प्रवेशद्वार तयार करण्यासाठी जागा आवश्यक असून हायकोर्टने यावरील स्थगिती उठवावी अशी विनंती एमएमआरडीए च्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली.