तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा होती विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा सोमवारी काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. तांत्रिक कारणामुळे निर्माण झालेल्या बिघाडानंतर प्रवाशांना मेट्रोमधून एअरपोर्ट रोड येथे उतरवण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीवरून सांगण्यात येत होते. दरम्यान यामुळे मेट्रो वाहतुकीचे वेळापत्रक बिघडले होते. काही वेळातच हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि मेट्रो सेवा सुरळीत करण्यात आली.