Mexico armed attack सशस्त्र हल्ल्याने मेक्सिको हादरले, 24 जणांचा मृत्यू

Photo Courtsey- Twitter

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जग त्रस्त असतानाही माथेफिरूंनी दहशत पसरवण्याचे उद्योग बंद केलेले नाहीत. मेक्सिकोमध्ये सशस्त्र हल्ला झाला असून यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसन केंद्रावर करण्यात आलेला आहे. गुआनाजुआटो राज्यामध्ये इरापुआटो शहराच्या अरांदास भागात हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये ७ जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचं वृत्त असून यातील 3 जण अत्यवस्थ आहेत.

मेक्सिकोतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला बुधवारी दुपारी झाला होता. हल्लेखोरांनी पुनर्सवन केंद्रात अंदाधुंद गोळीबार केला आणि सगळ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी कोणाचंही अपहरण करण्याचा प्रयत्न केला नाही. हा हल्ला गुआनाजुआतो भागात झाला असून हा भाग जालिस्को टोळी आणि स्तानिक गुंडांमधील संघर्षामुळे बदनाम आहे. हा हल्ला का केला याचे कारण कळू शकलेले नाही, मात्र या हल्ल्यामागे अंमली पदार्थांच्या टोळ्या असल्याचं कळालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या