
मेक्सिकोमध्ये आज एक खासगी विमान कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण बेपत्ता आहेत. मेक्सिको सिटीपासून 50 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.
अपघातग्रस्त विमान अल्कापुल्को येथून तोलुका विमानतळाकडे जात होते. विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाने जवळच्या फुटबॉल मैदानावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रयत्नात विमान एका कारखान्याच्या लोखंडी छताला घासले आणि कोसळले. त्यानंतर विमानाला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. विमानात आठ प्रवासी आणि दोन पायलट सदस्य होते. अपघाताला अनेक तास उलटून गेल्यानंतरही बचाव पथकाला त्यापैकी सात जणांचे मृतदेह बाहेर काढता आले आहेत. तीन जण अजुनही बेपत्ता आहेत. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.































































