नाले सफाई करताना मिळाला म्हशी इतका मोठा ‘उंदीर’, पाहा व्हिडीओ..

नाले सफाई करताना उंदीर मिळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र म्हशी इतका मोठा उंदीर नाल्यात दिसला, तर आश्चर्य वाटेलच. मेक्सिकोमध्ये नाले साफ करणाऱ्या कामगारांना मोठा उंदीर सापडला आहे. सफाई कर्मचारी मेक्सिको शहरात नाले सफाईचे काम करता असताना त्यांना हा विशालकाय ‘उंदीर’ मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या बर्‍याच भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पाणी अडवणूक होत असल्याने शहरातील अनेक भागात नाले सफाईचे काम सुरू असताना सफाई कर्मचाऱ्यांना हा उंदीर सापडला. सफाई कर्मचाऱ्यांनी हा उंदीर नाल्यातून बाहेर काढला. अधिकाऱ्यांनी याचा तपास केला असता, हा उंदीर बनावटी असल्याचे समोर आले. एव्हलिन नावाच्या एका महिलेने असा दावा केला आहे की, हॅलोविन सणासाठी हा उंदीर त्यांनी बनवला होता. दरम्यान, सोशल मीडियावर या उंदराचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेक मिम्स देखील बनवले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या