
मेक्सिकोची 25 वर्षीय मॉडल असलेली फातिमा बॉश 2025 ची मिस युनिव्हर्स बनली आहे. थायलंडमध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीनंतर तिच्या नावाची घोषणा झाल्यानंतर 2024 मधील मिस युनिव्हर्स डेन्मार्कची व्हिक्टोरिया केजर थेलविगने मिस युनिव्हर्सचा मुकुट तिच्या डोक्यावर चढवला.
थायलंडची प्रवीणर सिंह दुसऱ्या, तर व्हेनेजुएलाची स्टेफनी अबासेलीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. फिलिपिन्सच्या मा आहतिशा मनालोला चौथे स्थान मिळाले. या स्पर्धेत मनिका विश्वकर्मा ही हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत होती, परंतु ती टॉप 12 मध्ये पोहोचू शकली नाही. टॉप 30 मध्ये स्थान मिळवल्यानंतर मनिकाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु ती टॉप 12 मध्ये पोहोचू न शकल्याने तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. फातिमाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तिच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या सौंदर्यवतीमध्ये कोलंबिया, चीली, क्युबा, ग्वाडेलोप, मेक्सिको, प्युरटो रिको, व्हेनेझुएला, चीन, फिलिपिन्स, थायलंड, माल्टा आणि कोटे डी आय वर या देशांच्या सौंदर्यवती पोहोचल्या होत्या. परंतु मेक्सिकोच्या फातिमा बॉशने अखेर बाजी मारली.





























































