मोठी बातमी – केंद्र सरकारने राज्यांना दिले मॉक ड्रिलचे आदेश, नागरिकांना ‘या’ गोष्टींचे दिले जाणार ट्रेनिंग

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान काहीतरी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज सरंक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. त्याच दरम्यान आता केंद्र सरकारने राज्यांना मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत. 7 मे रोजी हे मॉक ड्रिल घेण्यास सांगण्यात आले आहे.

या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना विद्यार्थ्यांना हल्ला झाला तर स्वत:चे संरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

हे आहेत निर्देश – 

1 हवाई हल्ला झाल्यास अलर्ट म्हणून सायरन वाजवले जाणार
2 हल्ला झाला तर स्वत:चे संरक्षण कसे करायचे याचे नागरिकांना व विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार
३ क्रॅश ब्लॅक उपाययोजना
४ नागरिकांची सुटका करण्याचे प्रकार आणि त्याची प्रॅक्टिस