अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना दरमहा 20 हजार भाडे

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने नुकतीच 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कमी संक्रमण गाळे उपलब्ध असल्यामुळे आता या रहिवाशांना दरमहा 20 हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. अनेक रहिवासी संक्रमण शिबिरात राहायला जाण्यासाठी तयार नसतात. या निर्णयामुळे रहिवासी आपल्या पसंतीनुसार घर भाडय़ाने घेऊ शकणार आहेत.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे पावसाळापूर्व सर्वेक्षणात 96 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक इमारतींमध्ये सुमारे 2400 रहिवासी वास्तव्यास असून त्यांना तातडीने संक्रमण शिबिरात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मंडळाकडे केवळ 786 संक्रमण गाळे उपलब्ध असल्याने अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरातून पर्यायी निवासाची व्यवस्था देणे मंडळास शक्य नाही. त्यामुळे पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर एखादी दुर्घटना घडून रहिवाशांच्या जीवितास धोका पोहचू नये यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दरमहा 20 हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

400 घरे भाड्याने घेणार

भाडे देण्याव्यतिरिक्त बाह्य यंत्रणेमार्फत तीन वर्षांकरिता 180 ते 250 चौरस फुटांची 400 घरे भाडय़ाने घेण्याबाबत जाहिरात देण्याचे आदेश मुंबई इमारत