MI ज्युनियरच्या तिसऱ्या सत्राला सुरुवात; 200 हून अधिक शाळांचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

MI ज्युनियरच्या आंतर-शालेय क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या सत्राला आज मुंबईत सुरुवात झाली. यावेळी हिंदुस्थानी संघाचा क्रिकेटपटू विनय कुमार यांनी लहान मुलांशी संवाद साधला आणि त्यांना क्रिकेटबद्दल मार्गदर्शन केले. MI ज्युनियर ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे आणि त्यामध्ये अंडर-14 मुले, अंडर-16 मुले आणि अंडर-15 मुलींचा समावेश असेल. तीन शहरांमधील 200 हून अधिक शाळांमधील 2500 हून अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

प्रथमच या स्पर्धेत क्रिकेट संघटनांकडून मान्यता प्राप्त महिला पंच आणि स्कोअरर यांचा समावेश असणार आहे. एमआय ज्युनियर हा उपक्रम मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी राबवला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन तळागाळातील क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे.