विराट वेगवान यश मिळवणारा हिंदुस्थानी कर्णधार, मायकल वॉनची स्तुतिसुमने

470

मी आजवर हिंदुस्थानचे अनेक कर्णधार पाहिले. पण विराट कोहलीसारखा वेगाने संघासाठी मोठे यश मिळवणारा कर्णधार मात्र पहिल्यांदाच पाहतोय. विराटची यशासाठीची भूक खरेच स्तुत्य आणि क्रिकेटशौकिनांना आपल्या प्रेमात पाडणारी आहे, अशा शब्दांत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने विराटवर स्तुतिसुमनांचा वर्षाव आपल्या ट्विटद्वारे केला आहे.

इंदूर कसोटीत बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा दहावा डावाने विजय ठरला. धोनीने कर्णधार म्हणून नऊ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाला डावाने विजय मिळवून दिला होता. तर मोहम्मद अझरुद्दीनने आठ वेळा हा पराक्रम केला होता. त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने विराटचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘टीम इंडियाचे विविध कर्णधार झाले. त्यातील अनेक कर्णधार यशस्वी ठरले, पण विराट हा हिंदुस्थानचा सर्वात जलदगतीने यशस्वी ठरलेला कर्णधार आहे’, असे वॉनने ट्विट केले.

आपली प्रतिक्रिया द्या