
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रसिद्ध व्हिडीओ का@लिंग अॅप स्काइप अखेर बंद करण्यात आले. वाढती स्पर्धा, टेक्नॉलॉजी विकास आणि कंपनीच्या धोरणांना प्राधान्य डोळय़ासमोर ठेवून पंपनीने हे अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने स्काइपची सुरुवात 2003 साली एस्टोनिया येथे केली होती. या सर्विसमधून इंटरनेटद्वारे फ्री व्हाईस आणि व्हिडीओ कॉलिंगची सुविधा मिळत होती. 2005 मध्ये ईबायने याला 2.6 बिलियन डॉलर्समध्ये म्हणजेच जवळपास 2 हजार कोटी रुपयांत खरेदी केले होते. 2011 मध्ये मायक्रोसॉफ्टने याला 8.5 बिलियन डॉलर्स म्हणजेच 7100 कोटी रुपयांत खरेदी केले होते. स्काइपकडे मंथली 150 मिलियन युजर्स होते, परंतु 2020 पर्यंत संख्या कमी होऊन केवळ 23 मिलियन युजर्स राहिले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे स्काइपच्या तुलनेत मार्पेटमध्ये नवीन प्लॅटफॉर्म आले. यामध्ये झूम, गुगल मीट, व्हॉट्सअॅप आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सचा समावेश आहे. हे अॅप जास्त फ्रेंडली आणि जबरदस्त फिचर्ससोबत आहेत. त्यामुळे स्काइपचा इंटरफेस जुना आणि फिचर्स जुने झाले होते. सध्या स्मार्टपह्नचा जमाना आहे. त्यामुळे स्काइपकडे युजर्सचे दुर्लक्ष झाले.