
जगातील आघाडीची टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टने एपूण कर्मचाऱ्यांपैकी 2.1 टक्के कपात केली आहे. कंपनीच्या या कपातीमुळे जवळपास 4 हजार 800 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विंडोज बनवणाऱ्या या कंपनीच्या कर्मचारी कपातीमागे एआय पायाभूत सुविधांवर मोठा खर्च करण्याची योजना आहे. कंपनीने एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाढवला असल्याने कंपनीने ही कर्मचारी कपात केली आहे.






























































