स्वत:च्याच पोटावर पाय! AI बनवणाऱ्या इंजिनिअर्सच्याच गेल्या नोकऱ्या, मायक्रोसॉफ्टने दिला नारळ

आयटी इंडस्ट्रीमधील दिग्गज म्हणवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मायक्रोसॉफ्टसाठी आर्टीफिशल इंटेलिजंस सिस्टम बनवणाऱ्या इंजिनियर्सलाच कंपनीने नारळ दिला आहे. आता AI चं तुमचं काम करेल असे सांगत या कर्मचाऱ्यांना डच्चू देण्यात आला.

मायक्रोसॉफ्टने गेल्याच आठवड्यात 6,800 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील त्यांच्या 3% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2024 पर्यंत कंपनीत सुमारे 2 लाख 28 हजार कर्मचारी कार्यरत होते. याचा अर्थ आता सुमारे 6,800 कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावतील.