प्रवासी मजुरांना लॉकडाऊनपूर्वीच सोडले असते तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नसता- तज्ज्ञांचे मत

1430

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी मजूर अडकले होते. या मजुरांना आधीच आपापल्या घरी सोडले असते तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नसता असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

एम्स, जेएनयू आणि बनारस विद्यापीठासह इतर संस्थांतील काही तज्ज्ञांनी एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार अनेक प्रवासी मजुरांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ज्या भागात वैद्यकीय व्यवस्था चांगली नाही त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. 25 ते 30 मार्च दरम्यान हा काळ लॉकडाऊनचा सक्तीचा काळ होता, याच काळात कोरोनाच्या संख्येत वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.  धोरण आणि निती बनवण्यार्‍यांनी मोठ्या प्रमाणात सामान्य प्रशासनिक नोकरशहावर विसंबून राहिले. या काळात महासाथीचे तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि औषध तज्ज्ञांशी सिमीत चर्चा झाली असेही अहवालात म्हटले आहे. त्याचा परिणाम आता संपूर्ण देशावर होत आहे.

या महासाथीदरम्यान लस शोधण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहे त्याची माहिती आणि आकडेवारी सार्वजनिक केली पाहिजे त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल असे अहवालात म्हटले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन झालेच पाहिजे यावर अहवालात जोर देण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊन दरम्यान नागरिकांच्या मानसिक आरोग्याचाही विचार केला पाहिजे असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या