
सामना ऑनलाईन, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकrय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बीकेसीमधील ‘भारत डायमंड बोर्ज’ येथे हिरे व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन देत काँग्रसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मात्र तिथून निघत असताना त्यांना मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजीचा सामना करावा लागला. यावेळी त्यांच्यासोबत माजी वाणिज्य मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा देखील होते.
मुंबईतल्या नामांकीत हिरेव्यापाऱ्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या सोबत एका बैठकीचे गुरुवारी आयोजन केले होते. यामध्ये अनुप मेहता, भरत शहा तसेच आकाश अंबानीचे सासरे रुसेल मेहता यांचा समावेश होता. “माझ्या कुटुंबाचे हिरे व्यावसाय तसेच सराफ बाजाराशी जुने नाते आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून तुम्ही आम्हाला पाठींवा दिला आहे तो आताही द्यावा असे आवाहन मिलिंद देवरा यांनी केले.9 वर्षांपूर्वी आपण दसऱ्याच्या मुहुर्तावर ‘भारत डायमंड बोर्ज’ या इमारतीचे उत्घाटन करण्यासाठी येथे आल्याची आठवण आनंद शर्मा यांनी सांगितली. देशाच्या प्रगतीत हिरे व्यावसायाचे मोठे योगदान असल्याचे काँग्रेस पक्षाच्या ध्यानात आहे. तसेच मुरली देवरा हे नेहमीच व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीत प्रयत्न करायचे त्यामुळे मिलिंद देवरांना पाठिंबा द्या असे आवाहन आनंद शर्मा यांनी केले.
भारत डायमंड बोर्ज येथील बहुतांश व्यापारी हे भाजप समर्थक मानले जातात. नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीवरील कारवाईमुळे हिरे व्याव्यसायाला मोठा फटका बसल्याचं मान्य करतानाच मोदींनी चांगले काम केल्याची जाहीर कबुली हिरे व्यापारी भरत शहा याने दिली आहे. ही बैठक संपवून बाहेर पडत असतेवेळी मिलिंद देवरांसमोरच हिरे व्यापाऱ्यांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यामुळे देवरा यांचा जाम मोठा पचका झाल्याचं बोललं जात आहे.


























































