पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात, मिलिंद नार्वेकर आणि अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरेंकडे दिले धनादेश

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे संसार व शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अजय चौधरी व मिलिंद नार्वेकर यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या दोन्ही आमदारांनी त्यांच्या मदतीचा चेक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.