
सामना ऑनलाईन,मुंबई
गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी आज परतली. हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी झाल्याने तेथून येणाऱ्या वाऱ्यांमुळे अवघा महाराष्ट्र गारठला. मुंबईत तर थंडीला पारा वार उरला नाही. कमाल तापमान 16.7 डीग्रीपर्यंत घसरल्याने मुंबईकर अक्षरशः कुडकुडले. राजस्थान आणि गुजरातमध्येही पारा चांगलाच घसरला आहे. आणखी दोन दिवस मुंबईत झोंबणारी थंडी असेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबईच्या प्रमुख भागांमध्ये आज सकाळी नोंदवण्यात आलेले तापमान खालीलप्रमाणे आहे.
- मुलुंड पश्चिम- 16.7 डीग्री सेल्सियस
- विक्रोळी-17.6 डीग्री सेल्सियस
- दहिसर-18.4 डीग्री सेल्सियस
- सांताक्रूझ-19.2 डीग्री सेल्सियस
- वर्सोवा गाव-19.4 डीग्री सेल्सियस
- दादर(पूर्व), माटुंगा-19.6 डीग्री सेल्सियस
- कुलाबा-20.1 डीग्री सेल्सियस
मुंबईत ढगाळ वातावरण राहील.
विदर्भ आणि मराठवाडय़ात येत्या 24 तासांत हलका पाऊस होईल असा अंदाज असून मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र येथे थंडीचा कडाका वाढेल असे स्कायमेटच्या महेश पलावत यांनी सांगितले. मुंबईत आज कुलाब्यात 27.6 डीग्री सेल्सियस तर सांताप्रुझमध्ये 27.2 डीग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणारे थंडगार वारे यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.






























































