
मतचोरीच्या आरोपाने मुंबई मराठी साहित्य संघाची निवडणूक गाजत असतानाच या निवडणुकीत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मतदानाने साहित्य वर्तुळातून आणि सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
साहित्य संघाच्या निवडणुकीत ऊर्जा आणि भालेराव विचार मंच असे दोन पॅनल उभे आहेत. 17 सप्टेंबरपर्यंत या निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालणार आहे. त्यातच संस्थेचे सन्माननीय सभासदत्व मिळवलेल्या लोढा यांच्या मतदानाचे फोटो झळकले आणि त्यावरून सोशल मीडियातून तसेच साहित्य वर्तुळातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
संघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्पृत पॅनल आहे. या पॅनलमागे मंत्री लोढा यांनी ताकद लावली आहे. त्याचे कारण काय, असा सवाल सोशल मीडियातून विचारण्यात आला. साहित्य संघ संस्थेला मरगळ आलेली असून साहित्य संघ मंदिराच्या वास्तूवर तर पुणाचा डोळा नाही ना, असा सवालही सोशल माध्यमातून विचारण्यात आला.



























































