
सामना ऑनलाईन । मुंबई
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी उद्योजकांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविल्याने उद्योजकांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योजकांचा पुरस्कार सोहळा हॉटेल लिला येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचे उद्योग धोरण हे उद्योग व्यवसायाला प्रेरणा देणारे असल्यामुळे उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असेही देसाई यांनी सांगितले.
या सोहळ्यात महिंद्रा उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरुनानी, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया नायर, एल एण्ड टी टेक्नॉलॉजिस सर्व्हीसेसचे प्रभाकर शेट्टी तसेच इतर उद्योजकांना पुरस्कर देवून गौरविले. यावेळी इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या मधुलिका गुप्ता, उद्योजक आदी गोदरेज, सुरेश कोटक, शैलेया हरीभक्त, उदय खन्ना आदी उपस्थित होते.





























































