मालवण कुपेरी घाटीत ट्रकला कलंडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

कोल्हापूरहुन मालवणच्या दिशेने येणारा ट्रक कुणकवळे (मालवण) येथील कुपेरी घाटीत सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ब्रेक फेल होऊन गटारात कलंडला. यात ट्रकचे नुकसान झाले असून  सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

कोल्हापूर येथून मालवण देऊळवाडा येथे  स्टीलचे साहित्य घेऊन येणारा मालवाहक ट्रक सोमवारी सकाळी  कसाल- मालवण मार्गावरील कुणकवळे येथील कुपेरी घाटीत आला असता ट्रकचे ब्रेक नादुरुस्त झाले. त्यामुळे चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून ट्रक मागे येत  रस्त्यालगतच्या गटारात कलांडला. मात्र तेथे असणाऱ्या झाडांमुळे ट्रक अडला गेला. अन्यथा ट्रक तेथील घळणी मध्ये पलटी होऊन अनर्थ घडला असता. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुपारी दुसरा ट्रक मागवून अपघातग्रस्त ट्रकमधील स्टील साहित्य त्यात भरून मालवणमध्ये नेण्यात आले. त्यानंतर कलंडलेला ट्रक बाहेर काढण्यात आला.