
मुंबईतील कफ परेड भागात असणाऱ्या मच्छिमार नगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास चाळीला आग लागली. या आगीत होरपळून एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळआलेल्या माहितीनुसार, मच्छिमार नगर येथील चाळीच्या पहिल्या मजल्यावर पहाटे चारच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बचावकार्य सुरू करत चार जणांच्या आगीच्या विखळ्यातून बाहेर काढले.
जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी 15 वर्षीय यश खोत याला मृत घोषित केले. तर देवेंद्र चौधरी (वय – 30) यांची प्रकृती चिंताजनक आहे. विराज खोत आणि संग्राम कुर्णे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
News Alert ! One killed, three injured as fire breaks out at chawl in Mumbai’s Cuffe Parade area: Officials. pic.twitter.com/hb7mbvYKSL
— Press Trust of India (@PTI_News) October 20, 2025