सातशे रुपये परत मागितल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने केला निखीलचा ख़ून

888

उधार दिलेले सातशे रुपये परत मागितल्यावरून झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलानेच निखिलचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.

11 फेब्रुवारी रोजी निखील काबंळे हा 13 वर्षांचा शाळकरी मुलगा बेपत्ता झाला होता. शनिवारी त्याचा मृतदेह मिरजोळे करंदीकरवाडीत सापडला. दगडाने ठेचून निखिलचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेताना एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले की,निखिलने त्या अल्पवयीन मुलाला 1 हजार रुपये दिले होते. त्यापैकी सातशे रुपये परत देण्यासाठी निखीलने तगादा लावला होता. त्यावादातूनच त्या अल्पवयीन मुलाने सर्वप्रथम निखीलचा गळा घोटला त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे तपासात उघड़ झाले आहे असे मुंढे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या