पेणमध्ये आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

505

पेण तालुक्यातील वरसई आदिवासी आश्रमशाळेतील दहावीत शिकत असणार्‍या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे.  शिल्पा नाग्या शिंद असे मृत मुलीचे नाव असून ती 16 वर्षाची होती.

शिल्पा शिंद ही मुलगी बुधवार सकाळपासून आदिवासी आश्रम शाळेतून बेपत्ता होती. गुरूवारी सकाळी पेण पोलीस ठाण्यात प्राचार्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दुपारी सदर मुलगी आश्रम शाळा परिसरात झाडाला फास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

शिल्पाची आत्महत्या की घातपात याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या विद्यार्थिनीच्या पार्थिवाला शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या