
श्रीरामपूर गावात राहणाऱ्या दोन तरुणांनी इंदिरा नगर भागात राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना भोकर (ता. श्रीरामपूर) गावात बुधवारी घडली. अक्षय अशोक मते व ज्ञानेश्वर संतोष मोरे असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.
तु माझ्याशी लग्न कर, असे म्हणत ज्ञानेश्वर मोरे याने 16 वर्षीय विद्यार्थिनीचा हाथ धरून विनयभंग केला. मुलीने आरडाओरडा केल्यावर मुलीची आजी घराबाहेर आली. त्यावेळी अशोक मते व ज्ञानेश्वर मोरे या दोघांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, शिवीगाळ केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन बुधवारी रात्री उशिरा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अक्षय अशोक मते व ज्ञानेश्वर संतोष मोरे या दोघांविरुद्ध जीवे मारण्याची धमकी, विनयभंगासह, पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करत आहे.


























































