जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीनावर कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या भांडणाच्या रागातून तिघाजणांनी मिळून अल्पवयीनाच्या डोळ्यात स्प्रे मारून कोयत्याने वार केल्याची धक्कदायक घटना 9 सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास स्वारगेट परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजीज उर्फ हिरा शेख (वय 50, रा. गुलटेकडी), रोशन घोरपडे (वय 18), शंकर निखले (वय 35) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. शुभम पवार (रा. सहकारनगर) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि आरोपी अजीज यांच्या मुलाची एक वर्षापूर्वी भांडणे झाली होती. त्यामुळे आरोपीचा मुलगा कारागृहात शिक्षा भोगत आहे.

त्याचा राग मनामध्ये धरून अजीजने साथीदारांच्या मदतीने 9 सप्टेंबरला शुभमला अडविले. त्याच्या डोळ्यात स्प्रे मारून कोयत्याने वार करीत गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे तपास करीत आहेत.