
हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा 2025 मध्ये 14 सदस्यीय हिंदुस्थानच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 2 ते 11 ऑक्टोबरदरम्यान नॉर्वेच्या फॉरड येथे ही स्पर्धा पार पडत आहे. 31 वर्षीय मीराबाई चानूने पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून जोरदार पुनरागमन केले होते.
मोठय़ा व्यासपीठावर हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकावणाऱ्या मीराबाईकडून यंदाही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. तिने 2017 मध्ये सुवर्ण (48 किलो) तर 2022 मध्ये बोगोटा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (49 किलो) रौप्यपदकाची कमाई केली होती. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा 2025 ही केवळ एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा नसून पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी चाचणी परीक्षा म्हणूनही महत्त्वाची आहे.
हिंदुस्थानचे शिलेदार
महिला गट
मीराबाई चानू (48 किलो) कोयल बार (53 किलो)
बिंद्याराणी देवी (58 किलो) निरुपमा देवी (63 किलो)
हरजिंदर काwर (69 किलो) वंशिता वर्मा (86 किलो)
महक शर्मा (86 किलो)
पुरुष गट
त्र्ऋषिकांत सिंह (60 किलो) मुथुपंडी राजा (65 किलो)
अजित नारायण (71 किलो)
अजय बाबू वल्लुरी (79 किलो)
अभिषेक निपाने (88 किलो) दिलबाग सिंह (94 किलो)
लवप्रीत सिंह (110 किलो)